Friday, January 27

टोमॅटो सूप

लागणारा वेळ: 
२० मिनिटे 
लागणारे जिन्नस: 
१०-१२ टोमॅटो ,५-६ कांदे ,१०-१२ लसूण, मिरे पूड, फ्रेश क्रीम, दिड चमचा साखर,चवीपुरते मिठ 
क्रमवार पाककृती
 
  टोमॅटो , कांदे , लसूण मोठे चिरून कुकर मध्ये अगदी  थोडेसे पाणी घालून उकडून घ्या .
 थंड झाले की मिक्सरवर वाटून घ्यावे, ही  चाळणीवर गाळून घ्यावी, गाळलेले मिश्रण पातेल्यात घ्या .
 त्यात मीठ , साखर, आणि मिरेपूड घालून चांगले उकळावे . वरून क्रीम हवे तसे घालावे . आणि ............
गरम गरम पिऊन टाकावे
माहितीचा स्रोत: 
जाऊबाई 

Monday, January 23

चवळीच्या डाळीचा ढोकळा

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एक वाटी चवळी  डाळ , चार मिरच्या, बोटभर लांब आले, चार-सहा लसूण-पाकळ्या, मीठ, सोडा
क्रमवार पाककृती
रात्री डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून टाकावे व डाळ बारीक वाटावी. वाटलेली डाळ चार ते सहा तास भिजत ठेवून द्यावी. मिरची, लसूण व आले वाटून घ्यावे, वाटलेल्या डाळीत आले, मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ सर्व मिश्रण एकसारखे कालवावे. अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यात विरघळवून घेऊन, तो डाळीच्या पिठात घालून, ते एकसारखे कालवावे . थाळ्याला तेलाचा हात पुसून, त्यात पिठाचे मिश्रण पसरून घालावे व वाफेवर उकडून घ्यावे दहा-बारा मिनिटे वाफवावे. वाफवून झाल्यावर वड्या पाडून ठेवाव्या.
अधिक टिपा: 
पिठ चांगले फुगुन आले पाहिजे तरच जाळी तयार होते.

झटपट डोसे (पोहे - तांदळाचे)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
जाड पोहे १वाटी
तांदूळ २ वाटी
मीठ चविनुसार
क्रमवार पाककृती: 
पोहे आणि तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात १तास भिजत घालावे.
१का तासानी ते वेगवेगळे वाटुन घ्यावे. (तांदूळ कणी लागणार नाही इतके बारिक वाटावेत्, वाटायला वेळ लागतो)
मग त्या दोन्हीचे मिश्रण एकत्र करावे.
चविनुसार मीठ घालुन तयार मिश्रणाचे डोसे घालावेत.
चटणी आणि सांबार बरोबर खाण्यास द्यावे.
हे डोसे लवकर होतात आणि छान ही लागतात.
माहितीचा स्रोत: 
आई

उकड कुंडगुळ/शेंगोळे/चिमटे

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
ज्वारीचे पीठ २ वाटी , १ मोठा चमचा गव्हाचे पीठ , १ चमचा जीरा पावडर, हिंग, चिमटीभर ओवा , मीठ,
क्रमवार पाककृती: 
ज्वारिच्या पिठात गव्हाचे पीठ एकत्र करुन त्यात जीरा पावडर, हिंग, ओवा , मीठ घालून मलून जरासेच तेल लावून चांगले मळून घ्यावे . त्याचे कडबोळीच्या आकारा सारख्या गोल रिंग  करून घ्याव्यात.
तेलात जराशी जीरा पावडर घालून ४ वाट्या पाणी घालून उकळी आली की गोल रिंग  त्यात टाकुन हलक्या हातने हालवावे. वरून तेलाचि धार घालायची आणी वाफऊन घ्याव्यात. जरा जास्तच रस्सा असावा .
वाढणी/प्रमाण: 
३-४ जण
अधिक टिपा: 
उलथण्याने शिजले का ते बघावे. नाहि चिकटले तर शिजले असे समजावे.
माहितीचा स्रोत: 
आई

उरलेल्या चपातीची चकली

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
रात्रीच्या उरलेल्या १-२ चपाती, २ मोठे चमचे तांदुल पीठ, १ छोटा चमचा बेसन, तिखट, मीठ , जिरे-धने पावडर, चवीप्रमाणे, तेल.
क्रमवार पाककृती: 
१)चपातीचा मिक्सरवर एकदम बारीक चुरा करून घ्यावा.
२) त्यात तान्दलाचे पीठ,बेसन, हळद, तिखट, मीठ, जिरे-धने पावडर घालून थोडस पाणी घालून एकजीव करून घ्यावे.
३) आवडत असल्यास ओवा पण घालावा.
४) नेहमीप्रमाणे शेवग्याने चकल्या कराव्या. ब्राउन कलर वर तळून घ्याव्यात.
वाढणी/प्रमाण: 
७-८

साधे सोपे कटलेट

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
१ कान्दा , १ टोमॅटो एकदम बारीक चिरून, २ चमचे तान्द्ळाचे पीठ , १ वाटी बेसन, मीठ, तिखट, तेल.
क्रमवार पाककृती: 
बेसन आणि तान्द्ळाचे पीठ एकत्र करून त्यात कान्दा आणि टोमॅटो, मीठ , ति़खट टाकून नीट मळून घ्यावे. चपटे अथवा लम्बाकार कटलेट बनवून तळावेत.
वाढणी/प्रमाण: 
८-१० तरी होतात

मिश्र कडधान्याची डाळ

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
आवडती कडधान्ये प्रत्येकी २ मोठे चमचे, लवन्ग ३, दालचिनी छोटा तुकडा , मीरी, जीरे पावडर, मीठ, तेल, आले बारीक किसून, कडीपत्ता, कोथिम्बीर.
क्रमवार पाककृती: 
कडधान्ये मोड आणून घ्यावीत , मिक्सर वर थोडी जाडसर वाटून घ्यावीत. लवन्ग , दालचिनी , मीरी बारीक पूड करून घ्यावीत, तेलावर जीरे आणि आले, कडीपत्ता, फोडणीला घालावे, त्यावर मसाल्याची पूड घालावी.
यावर जाडसर वाटलेले डाळीचे मिश्रण टाकून, मीठ टाकून खरपूस परतावे.
वरून खोबरे , कोथिम्बीर, टाकून वाढावे.

अधिक टिपा: 
डाळ मिक्सर वर वाटताना शक्यतो पाणी न घालता वाटावी. नाहीतर गोळा होईल.

काकडीचे धोंडास

लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 
२ काकडीचा कीस , गूळ, रवा, मीठ (किन्चित), वेलची पूड,
क्रमवार पाककृती: 
काकडीचा कीसात गूळ, मीठ रवा(जरासा जाडसर असावा ), घालून ३ तास भिजवत घालावे
( काकडीला जरा पाणी सुटते ) .
३ तासनि त्यात वेलची पूड घालून सगळे  एकत्र करुन घ्यावे.
एका ताटलीला तूप लावून घ्यावे, त्यावर हे मिश्रण  पसरावे. नंतर उकडून घ्यावे. आणि  वड्या कराव्यात.
हा गोव्या कडचा पदार्थ आहे.
एकदा करुन बघा,
जुन झालेली काकडी लागते याला आणि तांदळाचा जाडसर रवा वापरतात. चवीला खुप छान लागते.

मिरचिचे लोणचे

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
मिरचि ७-८ , मोहरी  १ मोठा चमचा, मेथ्या पाव चमचा, अर्धे लिम्बू, तेल
क्रमवार पाककृती: 
मिरचिचे तुकडे  करुन घावेत. मोहरी  आणि  मेथ्या भाजुन बारिक करुन घ्यावे.
जास्त तेला वर मिरचि परतून घ्याव्यात. वर ताटली  ठेवून  त्यावर पाणी घालावे.
१० मिनिटे वाफ येऊ द्यावी.
नंतर  त्यात मोहरी आणि  मेथ्या घाला. पाणी पण  घालावे, मीठ व लिंबाचा रस घालावा.
५ मिनिटे शिजू द्यावे. खुप छान लागते.

मटर वडा

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
500 ग्राम मटर, 4 टे.स्पून बेसन, 4 हिरवी मिरचि 2 टे.स्पून कोथिम्बीर , 1/3 लाल तिखट, 1/3 काळ तिखट, , 1 चिमूट सोडा, तेल, मिठ. थोडस आल.
क्रमवार पाककृती: 
मटर मिठाच्या पाण्यात थोडे उक्डून घ्या आणि बारिक करून घ्या.
त्यात बेसन, हिरवी मिरचि, कोथिम्बीर , लाल तिखट, काळ तिखट, 1 चिमूट सोडा, तेल, मिठ. थोडस आल टाकून नीट एकत्र करून घ्यावे.
पीठ जास्त पातळ करू नये.
नन्तर तेल गरम करून, मध्ये छिद्र पाडून ब्राऊन कलरवर तळून घ्यावे.
कोण्तत्याही चट्णी बरोबर छान लागतात.........

शिळ्या चपातीची बाकरवडी.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एकसारख्या लाट्लेल्या पातळ चपात्या, चिन्चेचा घट्ट कोळ, बेसन,चवीपूरती बडीशेप पावडर, मीठ, लाल तीखट, (चपात्या कणकेत भरपूर तेल घालून घडी न करता एकसारख्या लाटलेल्या असाव्यात, म्हणजे पोळीची घडी नीट येते.)
क्रमवार पाककृती: 
एका वाटीत चिन्चेचा कोळ घेऊन त्यात बेसनाचे पीठ, बडीशेप पावडर, मीठ, लाल तीखट,
नीट मिसळून घ्यावे. एका चपाती वर पसरून त्यावर हे मिश्रण पसरावे. त्यावर दूसरी चपाती ठेवून परत त्यावर आणखी एक चपती ठेवावी. अशा प्रकारे ३ चपत्याची गुन्डाळी करून घ्यावी.
या गुन्डाळ्या मोदक जसे वाफवतो तशा प्रकारे चाळणीवर वाफवून घ्याव्यात. पूर्ण गार होऊ द्याव्या.
गार झाल्यावर सूरीने कापून तेलान ब्राऊन कलरवर तळून घ्याव्यात.
एकदम कुरकुरीत होतात.
ताटात डावीकडची बाजू म्हणून देखिल ठेवता येईल...
वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलम्बून आहे.
अधिक टिपा: 
वड्या गार झाल्यावरच कापाव्यात....
लहान मुले आवडीने खातात , सोबत Tomato Ketch -Up  असेल तर मस्तच !!!


 

मिक्स व्हेज पुरी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
१ गाजर खिसून , १०-१२ फरस बी च्या शेन्गा, मोड आलेले मूग , पनिर खिसून, चवीप्रमाणे मीठ , २ हिरव्या मिरच्या, तेल, जीरेपूड , थोडीशी चमचा हळद, मक्याच पीठ.
क्रमवार पाककृती: 
गाजर , फरस बी च्या शेन्गा, मोड आलेले मूग एकत्र करुन कढईत ताटलीवर पाणी ठेवून उकडून घ्यावे.
त्यात किसलेले पनिर, चवीप्रमाणे मीठ , २ हिरव्या मिरच्या ठेचून ,जीरेपूड, हळद घालून नीट एकत्र करुन घ्यावे.
नन्तर त्यात मक्याचे पीठ घालावे. लाटता / पातळ थापायला याव ईतपत पीठ घालून मिक्स करुन घ्यावे.
पातळ थापून तेलात तळावे.

 
माहितीचा स्रोत: 
आई

कारल्याची इडली

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
कारल्याचा किस दिड वाटी, बेसन, हिरवी मिरची, लाल ति़खट, मीठ, तेल, सोडा
क्रमवार पाककृती: 
  • कारली किसून त्याला १० मिनिटे मीठ चोळून ठेवावे.
  • नन्तर ते पीळून सगळे पाणी काढून टाकावे.
  • त्यात बेसन, हिरवी मिरची बारीक करून , लाल ति़खट, मीठ ( जरा जपून कारण आधी लावले आहे) टाकावे.
  • इडलीच्या पीठाइतके पातळ करावे. आयत्या वेळी अगदी चिमूटभर सोडा पाण्यात विरघळवून टाकावा.
  • इड्ल्या उकडून गार झाल्यावर बरोबर मधून उभ्या कापून तेलात खमन्ग तळून घ्याव्या.
  • जी मुले कारले अजिबात खात नाहीत त्याना फसवून खाऊ घालायला एकदम सोपे.
  • खुप कुरकूरित होतात.





माहितीचा स्रोत
अल्फा टिव्ही वरचा कार्यक्रम.

वेगळाच बटाटे वडा

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
दम आलू च्या भाजी साठी वापरतो तसे छोटे बटाटे, उडदाच्या डाळीचे पीठ, तिखट, मीठ, तेल.
क्रमवार पाककृती: 
छोटे बटाटे मीठाच्या पाण्यात उक्डून साल काढून घ्यावे.
कव्हर साठी उडदाच्या डाळीचे पीठ, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे.
एक एक बटाटा थोड्याश्या तिखटात घोळवून वरील मिश्रणात बूडवून तळून घ्यावे.
पटकन होतात आणि छान लागतात.

 
अधिक टिपा: 
कव्हर मध्ये थोडा सोडा टाकला तरी चालेल.

@खव्वैया लोकांसाठी नविन ब्लॉग @

नमस्कार मंडळी !!!!
खव्वैया लोकांसाठी आजपासून नविन ब्लॉग चालू करत आहे, ही सगळी मी स्वयंपाक घरातील केलेली लुडबुड आहे , कृपया गोड मानून घ्यावी .
 .
http://pot-puja.blogspot.com/ 

आपणास अपेक्षित असणारी माहिती  geetanjaleer@gmail .com या मेल वर सांगावे.
आपल्या सर्वाच्या शुभेच्छा या ब्लॉग ला लवकरच प्रसिद्ध बनवतील हे अपेक्षा !!!