Monday, January 23

शिळ्या चपातीची बाकरवडी.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एकसारख्या लाट्लेल्या पातळ चपात्या, चिन्चेचा घट्ट कोळ, बेसन,चवीपूरती बडीशेप पावडर, मीठ, लाल तीखट, (चपात्या कणकेत भरपूर तेल घालून घडी न करता एकसारख्या लाटलेल्या असाव्यात, म्हणजे पोळीची घडी नीट येते.)
क्रमवार पाककृती: 
एका वाटीत चिन्चेचा कोळ घेऊन त्यात बेसनाचे पीठ, बडीशेप पावडर, मीठ, लाल तीखट,
नीट मिसळून घ्यावे. एका चपाती वर पसरून त्यावर हे मिश्रण पसरावे. त्यावर दूसरी चपाती ठेवून परत त्यावर आणखी एक चपती ठेवावी. अशा प्रकारे ३ चपत्याची गुन्डाळी करून घ्यावी.
या गुन्डाळ्या मोदक जसे वाफवतो तशा प्रकारे चाळणीवर वाफवून घ्याव्यात. पूर्ण गार होऊ द्याव्या.
गार झाल्यावर सूरीने कापून तेलान ब्राऊन कलरवर तळून घ्याव्यात.
एकदम कुरकुरीत होतात.
ताटात डावीकडची बाजू म्हणून देखिल ठेवता येईल...
वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलम्बून आहे.
अधिक टिपा: 
वड्या गार झाल्यावरच कापाव्यात....
लहान मुले आवडीने खातात , सोबत Tomato Ketch -Up  असेल तर मस्तच !!!


 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.