Tuesday, April 24

दोडक्याच्या शिरांची चटणी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
पाव किलो दोडक्याच्या शिरा , कड़ी पाला , लसूण, शेगादाण्याचा कूट, तेल , मीठ , मिरची , हिंग , जिरे
क्रमवार पाककृती: 
पाव किलो दोडक्याच्या शिरा कडून तेलावर खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या .
नंतर तेलावर हिंगाची फोडणी टाकून परतून घ्या. शिरा परतताना मिरची पण परतावी.
ह्यात कांदा बारीक चिरून फोडणीत घातला आणि परतले तरी खूप छान लागते....
वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे
माहितीचा स्रोत: 
आजी

गवारीची चवदार चटणी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
गावरान कोवळी गवार, कड़ी पाला , लसूण, शेगादाण्याचा कूट, तेल , मीठ , मिरची , हिंग , जिरे , साई खालचे दही ( आंबट नको )
क्रमवार पाककृती: 
एकदम कोवळी ( बिईया तयार न झालेली )गवार, मिरची तेलावर खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या .
दह्यात कालवून वरून मोहरीची फोडणी द्यावी....चवीपुरता साखर घालावी.
अतिशय चवदार लागते

आंबट चुक्याची चटणी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
आंबट चुक्याची पाने (देठ बरोबर घेतले तरी चालते ) , मीठ , मिरची , हिंग , जिरे , गूळ चवीपुरता
क्रमवार पाककृती: 
उन्हाळा असल्यामुळे नवीन प्रकारच्या चटण्या जेवताना छान वाटतात...माझ्या आज्जी कडून शिकले, तिला खूप प्रकारच्या चटण्या / कोशिंबिरी येतात..., ते पण कुठलेही रेसीपीचे पुस्तक न वाचता स्मित बागेतच लावला होता चुका..म्हणून try करून पहिली
आंबट चुक्याची पाने,मिरची थोड्याश्या तेलावर खरपूस परतून घ्या. मी चपात्या झालेल्या तव्यावरच परतून घेतला,
मिक्सर पेक्ष्या खलबत्यात वाटल तर अजून चान लागते...
जिरे पण खलबत्यात ओबडधोबड वाटले तर अजून चान लागते...
नंतर तेलावर हिंगाची फोडणी टाकून परतून घ्या. थोडासा गूळ घालून मुरवत ठेवावं,
वाढणी/प्रमाण: 
हवे तसे
माहितीचा स्रोत: 
आजी