Monday, January 23

चवळीच्या डाळीचा ढोकळा

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
एक वाटी चवळी  डाळ , चार मिरच्या, बोटभर लांब आले, चार-सहा लसूण-पाकळ्या, मीठ, सोडा
क्रमवार पाककृती
रात्री डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून टाकावे व डाळ बारीक वाटावी. वाटलेली डाळ चार ते सहा तास भिजत ठेवून द्यावी. मिरची, लसूण व आले वाटून घ्यावे, वाटलेल्या डाळीत आले, मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ सर्व मिश्रण एकसारखे कालवावे. अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यात विरघळवून घेऊन, तो डाळीच्या पिठात घालून, ते एकसारखे कालवावे . थाळ्याला तेलाचा हात पुसून, त्यात पिठाचे मिश्रण पसरून घालावे व वाफेवर उकडून घ्यावे दहा-बारा मिनिटे वाफवावे. वाफवून झाल्यावर वड्या पाडून ठेवाव्या.
अधिक टिपा: 
पिठ चांगले फुगुन आले पाहिजे तरच जाळी तयार होते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.