लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कारल्याचा किस दिड वाटी, बेसन, हिरवी मिरची, लाल ति़खट, मीठ, तेल, सोडा
क्रमवार पाककृती:
- कारली किसून त्याला १० मिनिटे मीठ चोळून ठेवावे.
- नन्तर ते पीळून सगळे पाणी काढून टाकावे.
- त्यात बेसन, हिरवी मिरची बारीक करून , लाल ति़खट, मीठ ( जरा जपून कारण आधी लावले आहे) टाकावे.
- इडलीच्या पीठाइतके पातळ करावे. आयत्या वेळी अगदी चिमूटभर सोडा पाण्यात विरघळवून टाकावा.
- इड्ल्या उकडून गार झाल्यावर बरोबर मधून उभ्या कापून तेलात खमन्ग तळून घ्याव्या.
- जी मुले कारले अजिबात खात नाहीत त्याना फसवून खाऊ घालायला एकदम सोपे.
- खुप कुरकूरित होतात.
माहितीचा स्रोत:
अल्फा टिव्ही वरचा कार्यक्रम.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.