Sunday, May 20

पोपट

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
लाल ओली मिरची १० ते १२ , लसूण, मीठ लिंबू , मोहरी तेल
क्रमवार पाककृती: 
एकदम लाल भडक ओली मिरची आणि लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
त्यात हवी असेल तर जिरे पावडर टाका मीठ आणि लिंबू पिळून घ्या
आता कडकडीत तेला मध्ये मोहरी फोडणी टाकून त्यावर ओता.
फ्रीज शिवाय सुद्धा ३ -४ दिवस टिकतो , उलट जसा शिळा होईल तसा छान लागतो
अधिक टिपा: 
ह्याच्या रंग पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल दिसतो म्हणून ह्याला पोपट म्हणत असावेत बहुतेक , पण चव एकदम मस्त !!! स्मित

डाळमिरची

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
तूर डाळ ( १/४ वाटी ) , मिरची १2-15 , कडीपत्ता , कोथिंबीर, लसूण खोबरे मीठ लिंबू
क्रमवार पाककृती: 
१. तूर डाळ भिजवत ठेवावी
२. मिरची चे बारीक तुकडे करून घ्यावे आणि थोड्या तेलावर जिरे, हिंग,कडीपत्ता ,लसूण खोबरे फोडणी टाकून मिरची परतून घ्यावी
३. भिजलेली डाळ त्यात घालून, वरून लिंबू पिळावे आणि मिरची शिजली जाईपर्यंत गरम करावे....
अधिक टिपा: 
झणझणीत डाळ मिरचू ताज्या / शिळ्या भाकरी बरोबर खूप छान लागतो...

Saturday, May 5

शिळ्या चपातीचा चाट

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
शिळ्या चपात्या ( मी कात्री ने एकसारखे बारीक तुकडे करून घेतले )
कांदा, कोथिंबीर, टोमाटो बारीक चिरून, बारीक शेव ,
मीठ, तिखट, चाट मसाला ( आवडत असेल तर ), मी नव्हता वापरला
क्रमवार पाककृती: 
रात्री च खूप काही उरल कि दुसरा दिवस शिळा- सप्तमी चा....
एकदा मेस च्या काकू नी चपात्याच्या चक्क चकल्या केल्या , ती कृती नंतर देईन...आता ही
चपात्या चे तुकडे कडक होईपर्यंत तळून घेतल्या ( असे तुकडे ३-४ दिवस सहज टिकतात )
त्यात बारीक चिरलेले कांदा, कोथिंबीर, टोमाटो टाकले
मीठ, तिखट आणि शेवटी शेव....
अधिक टिपा: 
आमच्या कडे छोट्या मुलांना पण खूप आवडत .शक्यतो त्यांनाच करायला सांगते....
अगदी जेवायला बसायच्या आधी एकत्र करायचा म्हणजे कडक राहतात चपातीचे तुकडे .