Wednesday, June 5

मेथीच्या चौघड्या



साहित्य : मेथी ( कोवळी ) १ वाटी , धुवून , लसुण चेचून , हिंग मीठ , नेहमीची कणिक १ वाटी  पण थोडी घट्ट मळलेली, तूप

कृती

 अतिशय सोपी, झटपट आणि पौष्टिक अशी हे पारंपारिक रेसिपी आहे . तेलात लसूण  आणि हिंग टाकून फोडणी करावी आणि त्यात लगेच थोडे पाणी टाकावे

ह्याला थोडीशी उकळी आली कि त्यात मेथीची भाजी टाकून हलवायचे , २ मिनिटे परतून परत त्यात १ ते २ ग्लास पाणी आणि मीठ  घालायचे

ताट  झाकून शिजायला ठेवून द्यायचे.

आता कणिकेची आपण पोळी करताना लाटतो तशी चौघडी लाटायची , पण पीठ न लावता , तेल लावून. चौघडी  पातळ असावी म्हणजे लवकर  शिजते .

आणि भाजीला उकळी आली कि त्यात सोडून १-२ मिनिटे झाकायची आणि आता गरम गरम तूप टाकूनच खायची

ह्यात मेथीच्या भाजीवरच चव अवलंबून आहे त्यामुळे भाजी कडवट नसावी .













No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.